भुसावळात शिवाजी नगरात सट्टा कारवाई –

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील शिवाजी नगर भागात हसमत खाँ देशी दारू दुकानाच्या मागे गोडावून मध्ये कल्याण मटका नावाचा सट्टा सुरू असल्याचे गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना पाठवून दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी कारवाई करून चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोकॉ ईश्वर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागात दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी ५.५ वाजेच्या सुमारास हसमत खाँ देशी दारू मागे गोडावून मध्ये आरोपी सतिष साहेबराव अहिरे वय २९ राहणार शिवाजी नगर भुसावळ.दिलीप उत्तमराव भालेराव वय ३५ राहणार सुदगाव तालुका रावेर ,शंकर रज्जाक पटेल वय ५८ राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ, हसमत खाँ देशी दारू दुकान मालक पूर्ण नाव माहीत नाही हे स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा खेळ खेळवित असतांना मिळून आले असून यांच्या कडून सट्टा जुगार खेळण्याचे सहित्य ८०३२ रुपये रोख तसेच ९६५०० रुपयांचे तीन मोबाईल फोन असे एकूण १४,५३२ रुपयांचा मुद्देमालसह चौघांविरुद्ध कारवाई करण्यात अलीे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *