भुसावळात शिवजयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण ; ज्येष्ठ नागरिकांचा उपक्रम ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील दत्तनगर मधील श्री त्रिमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष व निसर्ग पर्यावरण प्रदूषण मंडळाचे राज्य सल्लागार वैद्य श्री रघुनाथ आप्पा सोनवणे, निसर्ग मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील , प्रमुख पाहुणे डॉ. डी .एस. पाटील , राज्य तथा जिल्हामार्गदर्शक सुरेंद्रसिंग पाटील उपस्थित होते यावेळी श्री त्रिमुखी दत्त मंदिराच्या परिसरात शिव जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले मंदिरात च्या सभोवती निंब , वड, पिंपळ, कांचन , उंबर अशा विविध  वृक्षांचे वृक्षारोपण शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आले यावेळी  सर्व जेष्ठ्य नागरिक , मंदिराचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,
यावेळी निसर्ग समितीचे राज्य सल्लागार यांनी कोरोनाची परिस्थितीचा विचार करून शिवजयंतीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राबविला यासाठी निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले . शिवजयंती वेगळ्या स्वरूपात ज्येष्ठ नागरिक यांनी वृक्षारोपण करुन साजरी या उपक्रमाचे कौतुक केले, यावेळी जेष्ठ नागरिक डॉ. डी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष नाना पाटील, अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष  रघुनाथ आप्पा सोनवणे, सुरेन्द्रसिंग पाटील, रमेश साखळकर, वसंत बोरनारे, श्री. राणे, मधु ढाके, काशिनाथ पाटील , श्री चौधरी, श्री सिंगतकर, श्री बऱ्हाटे, श्री वाणी, ह.भ.प.पांगडेताई, व इतर महीला भगिनी , श्री त्रिमुखी दत्त मंदीराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *