२४० रूपयांची लाच भोवली ; तलाठ्यासह कोतवाल अटकेत ;

२४० रूपयांची लाच भोवली ; तलाठ्यासह कोतवाल अटकेत
भुसावळ (

तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील तलाठी प्रविण श्रीकृष्ण मेश्राम (वय-४१) व कोतवाल प्रकाश दामू अहीर (वय-४५) यांना अवघ्या २४० रुपयांची लाच घेणी चांगलीच भोवली आहे. उतार्‍यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी तलाठी आणि कोतवाल यांना २४० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सविस्तर असे की, तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील एका शेतकर्‍याला आपल्या उतार्‍यावरील बोजा कमी करायचा होता. यासाठी तलाठी प्रविण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहीर यांनी त्यांना लाच मागितली. याबाबत तडजोड होऊन २४० रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधीत शेतकर्‍याने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनुसार एसीबीचे उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांनी एका पथकाची नियुक्ती केली. या पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिरे यांना २४० रूपये स्वीकारतांना अटक केली. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *