औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथे प्रचंड द्वार सभा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील गणपती मंदिर गेट येथे संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीच्या आदेशानुसार खाजगीकरण माध्यमातून मागासवर्गीयांचा रिक्त अनुशेष नष्ट करण्याचे धोरण बंद करावे या मागणी साठी आज मंगळवार दुपारी १२ वाजता प्रचंड द्वारसभा घेण्यात आली .
यावेळी संघटनेचे दिपनगर शाखेचे कार्याध्यक्ष रोशन वाघ यांनी जोरदार घोषणा देत सूत्रसंचलन केले.
तसेच सचिव अख्तर तडवी यांनी खाजगीकरण माध्यमातून मागासवर्गीयांचा रिक्त अनुशेष नष्ट करण्याचे धोरण बंद करण्याच्या मागणीस तसेच संघटनेच्या धोरणात्मक मागण्या समजवून सभासदांनी ९ फेब्रुवारी प्रकाशगड मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनास भरपूर प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. तर यावेळी
दिपनगर शाखेचे सल्लागार मोहन सरदार यांनी आरक्षण,पदोन्नती मध्ये होणार अन्याय लक्षात घेता पदोन्नती पॅनल थांबविण्याची मागणी बद्दल माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *