व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही लावावे- सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ; भुसावळ व्यापारी असोसिएशनची बैठक संपन्न ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या अध्यक्षतेखाली सराफ असोसिएशन,कपडा व्यापारी असोसिएशन यांची बैठक संपन्न झाली.

शहरातील मेन मार्केटमधील सराफ असोसिएशन, कपडा व्यापारी असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी वर्ग, धान्य व्यापारी वर्ग यांचा मीटिंग मध्ये सहभाग होता सदर मिटिंग मध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या दुकानात खरेदी-विक्रीसाठी येणारे ग्राहकांना वाहने शिस्तीत लावण्याबाबत सूचना देण्यात याव्या .व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर हातगाडी लावणाऱ्यांना अतिक्रमण केल्याने दुकानात येणाऱ्यांना त्यांची वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने ते अतिक्रमण लवकरात- लवकर काढण्यात यावे अशी मागणी व्यापारी बाँधवानी यावेळी केली . कारण हातगाडी वाल्यांना दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितले असता ते अरेरारीची भाषा वापरतात तसेच दमदाटी देतात.कित्येक वेळा तर दुकानातील व्यापाऱ्यांना मारहाण केल्याच्या अप्रिय घटना याआधी घडलेल्या आहेत.पोलीस प्रशासनाने दुकाना समोरीतील हातगाडी लावण्याची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सोबत चर्चा करून हातगाडी लावणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी.जेणे करून शहरातील मेन मार्केट मधून वाहन चालकांना येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही.आदीं विषयांवर सखोल चर्चा झाली . तसेच
या बैठकीत मेन मार्केट मध्ये आपल्या दुकानाबाहेर चांगल्या प्रतीची सीसीटीव्ही कॅमेरे लावणेबाबत सांगण्यात आले तसेच त्यांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *