भुसावळ (प्रतिनिधी )-
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत हे कुठलीही खात्री न करतात गुन्हे दाखल करीत असून याबाबत त्यांची वरीष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. गेल्या काही वर्षापासून एकही गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र आता गेल्या दोन वर्षाच्या काळात चार गुन्हे दाखल केले आहे. यामुळे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी रविवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केली.
राजू सूर्यवंशी यांनी त्यांच्या संपर्क कार्यालत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले, की, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे
निरीक्षक कोणीही माझ्या विरूध्द तक्रार देण्यास आल्यावर त्या तक्रारीबाबत कुठलीही खात्री न करता थेट गुन्हा दाखल करत असतात यामुळे भागवत हे मला टार्गेट करीत आहे, मला व माझ्या परीवाराला त्यांच्यापासून धोका असल्याची भावना सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. गुन्हे बी फायनल न करता थेट न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले जाते. यापूर्वीचे तत्कालीन निरीक्षक देविदास पवार यांच्याकडून सुध्दा मला त्रास दिला जात होता. तीच स्थिती आहे. ज्या व्यक्तीचे शहरात अवैध व्यावसाय आहे, त्या व्यक्तीची फिर्याद घेऊन माझ्या गाडीवरील चालक इम्रान व भाऊ किशोर सूर्यवंशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे. शहरात अवैध धंद्यांचे थैमान सुरू आहे. त्या बाबत सुध्दा मी आवाज उठविला होता, त्याचेही पोलिस निरीक्षक भागवत यांना वाईट वाटले होते. त्यामुळे ते गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.
माझ्याबद्दल वरीष्ठांना खोटी माहिती देऊन मला हिस्ट्रीसिटर सिध्द करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी ठेकेदार आहे, मी 20 लाख रूपये जीएसटी भरला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दितील ढाबे, हॉटेल रात्री उशीरापर्यत सुरू राहतात, त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. जेही मोठे गुन्हे झाले ते रात्रीच झाल्याचा आरोप त्यांनी सूर्यवंशी यांनी केला.
पोलिसांकडून नियमानुसार कारवाई- पो नी. दिलीप भागवत ;
आरोपात कुठलेही तथ्य नाही ;
पोलिसांकडून नियमानुसार कारवाई केली जाते शिवाय विनाकारण कुणाविरुद्ध गुन्हे दाखल केले जात नाहीत तसेच यापुढेही कायदा-सुव्यवस्था राखण्यास आपले प्राधान्य राहील, असे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले.



