भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रजासत्ताक २६ जानेवारी २०२१ रोजी मुंबईच्या सी.एस.टी. रेल्वे स्टेशनवर तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध अकरा रेल्वे स्टेशनवर दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी भारतीय संविधान बचाव सेना व विविध दहा संघटनेच्या वतीने किसान तिरंगा रँली व रेल रोको आंदोलन दुपारी २ वाजता करण्यात येणार असल्याचे पि.आर.पी.चे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी 24 रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले .

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे बनवले आहेत .ते काळे कायदे त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय संविधान बचाव सेना व विविध दहा संघटनेच्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवर व जळगाव जिल्ह्यातील जळगाव , भुसावळ , अमळनेर , चाळीसगाव , पाचोरा , रावेर , बोदवड , धरणगाव , सावदा , वरणगाव , निंभोरा , इत्यादी रेल्वे स्टेशनवर किसान तिरंगा रॅली व रेल रोको आंदोलन दुपारी दोन वाजता करण्यात येणार असल्याचे पी आर पी चे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे .यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन , पि.आर.पी चे रावेर तालुका प्रमुख चंदु पहेलवान आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .


