पर्युषण पर्वकाळात कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन ; अहिंसा परमोधर्माचा संदेश; संवत्सरी क्षमापना दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन बांधवांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : जैन धर्मियांचे पवित्र पर्युषण पर्व ८ सप्टेंबरपासून देशभरात भक्तिभावाने सुरू असून, या पर्वकाळात विविध धार्मिक उपक्रमांसह कठोर तपश्चर्या, स्वाध्याय आणि पवित्र ग्रंथांचे वाचन सुरू आहे. पर्युषण पर्वाच्या माध्यमातून ‘अहिंसा परमोधर्म!’ तसेच ‘जिओ और जिने दो!’ या विचारांचा संदेश समाजात दिला जात आहे.

पर्युषण पर्वाच्या अंतिम टप्प्यात संवत्सरी क्षमापना दिन बुधवारी साजरा होणार आहे. या पवित्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व परिसरातील कत्तलखाने बंद ठेवावेत, तसेच या काळात प्राणिहिंसा टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जैन समाज बांधवांकडून करण्यात आले आहे.

पर्युषण पर्व हा आत्मशुद्धी, संयम, तप, त्याग आणि अहिंसेचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण धार्मिक पर्वकाळ आहे. त्यामुळे या कालावधीत प्राणिमात्रांप्रती दया व करुणेची भावना जोपासून अहिंसेचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत उतरवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत संघपती जयंतीलाल सुराणा, निर्मल कोठारी, रवि निमाणी, महेंद्र कोठारी, संजय चोरडिया, जे. बी. कोटेचा, मदनलाल ललवाणी, रविंद्र चोरडिया, सनी चोरडिया, मुकेश चोपडा, नितीन सुराणा, राजेश मेहता, बाळू सुराणा, विनोद मेहता, राजेश छाजेड, संजय सुराणा, गौतम चोरडिया, विशाल चोरडिया, विजय चोरडिया, डॉ. सुदेश सांखला, डॉ. मयूर चोरडिया, डॉ. नहार, डॉ. प्रमोद चोरडिया, अशोक डोसी, तिलोकचंद सिसोदिया, धर्मेंद्र सिसोदिया, अशोकचंद सुराणा, राजेश सुराणा, शिरीष नाहाटा, सुशील कोटेचा, धरमचंद चोपडा, संजय कोटेचा, राजू कोटेचा यांच्यासह जैन बांधवांनी आवाहन केले आहे.

पर्युषण पर्वाच्या निमित्ताने अहिंसा, जीवदया आणि परस्पर क्षमाभावाचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि संवत्सरीच्या पवित्र दिवशी शांतता, संयम व करुणेचे वातावरण निर्माण व्हावे, अशी अपेक्षा जैन समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.