नाहाटा महाविद्यालयात ललित कला स्पर्धा संपन्न 
 भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ 
नाहाटा वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी ललित कला स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. . बी एच. बऱ्हाटे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य  डॉ. जी. आर. वाणी, कार्यालय प्रबंधक श्री.भगवान तायडे,कला मंडळ प्रमुख डॉ.प्रफुल्ल इंगोले हे उपस्थित होते.
 ललित कला स्पर्धांमध्ये रांगोळी, मेहंदी,व्यंगचित्र,कोलाज, इन्स्टॉलेशन, फोटोग्राफी, स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडलिंग या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना विषय म्हणून महिला सबलीकरण, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, जेन झी, भारतीय संस्कृती सण उत्सव, सोशल मीडिया फायदे व तोटे, वन्यजीव संरक्षण ,माझ्या स्वप्नातील भारत, पर्यावरणीय बदल, मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणाई , महागाई ,भ्रष्टाचार, राजकारण  AI आणि मानवी जीवन इत्यादी होते.
 या स्पर्धेत एकूण 99 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. वंदना महाजन, डॉ. विद्या पाटील, प्रा.नयना चौधरी,डॉ.दिनानाथ पाठक,डॉ.सचिन राजपूत, प्रा.प्रणिता राणे, प्रा.सपना जंगले,डॉ. एस. के. राठोड, प्रा. नेहा महाजन, प्रा.गौतम भालेराव, डॉ. कविता पांडव, डॉ. प्रियंका महाजन, डॉ. जितेंद्र         आडोकार, प्रा. ज्ञानेश्वर जावळे, प्रा. सुनील अडकमोल, डॉ. शलाका निकम इ. नी सहकार्य केले.
 सदर स्पर्धेचे परीक्षण डॉ. रश्मी शर्मा, डॉ.गौरी पाटील,डॉ.स्मिता चौधरी,डॉ.ममता पाटील,डॉ.उमेश फेगडे,डॉ.विलास महिरे,डॉ. हर्षल पाटील, डॉ.एस.टी. धूम, डॉ. मनोज पाटील,डॉ.किरण वारके,डॉ.सचिन येवले, डॉ. दीपक पाटील, डॉ.मनोज जाधव इत्यादींनी केले.