सिद्धेश्वर नगरातील रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार ; नळ कनेक्शनचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरू असून, या कामासंदर्भात नागरिकांच्या विविध समस्या समोर आल्या आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणारे वॉटर सप्लायच्या नळ कनेक्शनचे काम अद्याप प्रलंबित असताना रस्त्याचे काम सुरू असल्याने भविष्यात पुन्हा रस्ता खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली.

सदर रस्त्याचे काम मंजूर इस्टिमेटनुसार तसेच उच्च गुणवत्तेचे व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष सिद्धेश्वर नगर येथे भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी मांडलेल्या विविध अडचणींबाबत संबंधित अधिकारी वर्गाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सिद्धेश्वर नगर परिसरातील इतर नागरी समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी श्री. भोये , बांधकाम अधिकारी श्री. सोनगीर , नगर परिषद वरणगाव तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. समाधान महाजन, नगरसेवक श्री. विनोद झोपे, सामाजिक कार्यकर्ते श्री. मिलिंद मेढे, शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. विलास मुळे, श्री. गणेश झोपे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.