भुसावळ (प्रतिनिधी ) -भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथे शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रांगण (जुने डी.एस. हायस्कूल प्रांगण), भुसावळ येथे होणार आहे. उपविभागीय अधिकारी, जितेंद्र पाटील, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती निता लबडे, तहसीलदार, भुसावळ यांनी केले आहे.


