भुसावळ (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., भुसावळ, जि. जळगाव, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व महाराणी अहिल्यादेवी महिला समाज प्रबोधन मंच, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या भुसावळ येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराणी अहिल्यादेवी महिला समाज प्रबोधन मंच, जळगाव शाखा (रावेर लोकसभा) अध्यक्ष सौ. सुजाता सोनवणे, सचिव सौ. राजश्री बादशहा, महाराणी अहिल्यादेवी महिला समाज प्रबोधन मंचाच्या भुसावळ तालुका अध्यक्षा सौ. उषाताई झटकार, सचिव सौ. हेमलता शिरोळे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालिका विद्याताई पवार व मिराबाई कुयटे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रल्हादभाऊ पवार, उपाध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे, व्यवस्थापक अविनाश काळे, संजय धनगर, दिनेश चंदन, निलेश झांबरे, मुकेश पाटणकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या समाजहिताच्या विचारांना उजाळा देण्यात आला.



