भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओझरखेडा गावातील एका युवकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून युवकाला ताब्यात घेतले असता, त्याचेकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आल्याने वरणगाव पोलीसांनी त्याला अटक केली आहे . याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरणगाव नजिकच्या ओझरखेडा गावात दिवगंत माजी सरपंच विकास पाटील यांच्या मुलाकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुस तो गावात दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती . त्यानुसार पोलीसांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास गावात गुरुवारी सकाळच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी रोशन विकास पाटील ( वय – २६, रा वझरखेडे ) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले. या प्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली असून या युवकाने गावठी कट्टा व काडतुस कशासाठी व कुणाकडून आणले याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत. तर एका छोट्याशा गावात २६ वर्षीय युवकाकडे गावठी कट्टा व काडतुस सापडल्याने ओझरखेडा गावासह परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, सुधाकर शिंदे, प्रशांत ठाकुर, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, फिरोज पठाण व भूषण माळी तपास करीत आहेत.


