नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उदघाटन संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) - कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे  विज्ञान मंडळाचे उदघाटन दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले .या  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उदघाटक म्हणून अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगांव चे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एच. बऱ्हाटे, महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी व विज्ञान मंडळ प्रमुख डॉ.सी. एच. सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उदघाटक प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी पर्यावरण संवर्धनावर मार्गदर्शन केले तसेच वाढते प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर आणि पाणीटंचाई या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांवर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधता येतात, असे त्यांनी सांगितले. सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या उपायांचा अवलंब करण्याचे व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे म्हणाले की, विज्ञानाने मानवी जीवन अधिक सुखकर केले असले, तरी वाढते प्रदूषण, वृक्षतोड, पाणीटंचाई आणि प्लास्टिकचा वाढता वापर या मुळे पर्यावरणीय समस्या गंभीर होत आहेत. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण, पाणी बचत आणि प्लास्टिकमुक्त परिसर यांसारख्या उपक्रमांत सहभागी व्हावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख डॉ.सी. एच. सरोदे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सौ. जी. एम. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सौ. व्ही. ए. पाटील, प्रा. डॉ. सौ. जी. एम. पाटील, प्रा. डॉ.  एस. डी. येवले, प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे, प्रा. डॉ. यू. ए. फेगडे, प्रा. डॉ. एच. व्ही. पाटील, प्रा. डॉ. एस. एस. कोलते, प्रा. डॉ. एन. एस. पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षेकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ - विज्ञान मंडळाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना प्रमुख अतिथी व उदघाटक डॉ. आर. के. नारखेडे (प्राचार्य, अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगांव), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी व विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे