भुसावळ(प्रतिनिधी)-, दि. 8 जुलै : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. रॅक उपलब्ध नसल्यामुळे भुसावळ–दादर आणि दादर–भुसावळ या दोन्ही एक्सप्रेस गाड्या 9 जुलै 2026 रोजी पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 19003 भुसावळ–दादर एक्सप्रेस ही 9 जुलै 2026 रोजी भुसावळ येथून पूर्णतः रद्द राहील. तसेच गाडी क्रमांक 19004 दादर–भुसावळ एक्सप्रेस हीदेखील 9 जुलै 2026 रोजी दादर येथून पूर्णतः रद्द राहणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केले आहे.


