भुसावळ (प्रतिनिधी )- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक २१ जून २०२६ रोजी एपीएस फिटनेस भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "योग म्हणजे स्वतःचा, स्वतःद्वारे, स्वतःकडे जाणारा प्रवास" या संदेशासह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगामुळे शरीराची लवचिकता व ताकद वाढते, ताणतणाव आणि चिंता कमी होतात, एकाग्रता व लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच मानसिक शांतता व सजगता प्राप्त होते. त्यामुळे निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून कमल गणपती हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी पांढरा पोशाख अनिवार्य ठेवण्यात आला असून हा उपक्रम केवळ महिलांसाठी आहे. एपीएस फिटनेस भुसावळ तर्फे पारूल वर्मा यांनी सर्व महिलांना या योग शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आले आहे.



