प्रवाशांच्या सोयीसाठी उधना ते मधुबनी आणि उधना ते झंझारपुर विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ

भुसावळ (प्रतिनिधी)- 
प्रवाशांची वाढती संख्या व सोयी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना ते मधुबनी आणि उधना ते झंझारपुर साप्ताहिक विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे:

 उधना ते मधुबनी साप्ताहिक विशेष 
गाडी क्रमांक 09045 उधना ते मधुबनी साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दिनांक 14.06.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 05.07.2026 पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09046 मधुबनी ते उधना साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दिनांक 15.06.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 06.07.2026 पर्यंत करण्यात आला आहे.
 उधना ते झंझारपुर साप्ताहिक विशेष 
गाडी क्रमांक 09047 उधना ते झंझारपुर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दिनांक 14.06.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 05.07.2026 पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09048 झंझारपुर ते उधना साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दिनांक 15.06.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 06.07.2026 पर्यंत करण्यात आला आहे.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन अॅप देखील डाउनलोड करू शकतात. संबंधित विशेष गाड्यांच्या थांब्यांबाबत सविस्तर वेळापत्रकासाठी [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.