भुसावळ विधानसभा काँग्रेस कमिटीच्या BLO-1 अध्यक्षपदी डॉ. राजेश मानोतकर यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. राजेश मानोतकर यांची भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी BLO-1 अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी भुसावळ विधानसभा क्षेत्रात एकूण 316 BLO-2 पदाधिकारी नियुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यांचे लवकरच प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच इच्छुक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी BLO-2 म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन BLO-1 अध्यक्ष डॉ. राजेश मानोतकर यांनी केले.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष धनंजय श्रीरंग चौधरी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र सिंह पाटील, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान, रहीम कुरेशी, नगरसेवक अहमद इब्राहीम कुरेशी, इस्माईल पहेलवान, अशफाक काजी, सुधाकर भडगुजर, कुरेशी सर, सरपंच विशाल पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत संघटनात्मक बांधणी, नियुक्त्या आणि आगामी प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.