भुसावळात “कोण होणार आवाज भीमाचा” भीमगीत कराओके स्पर्धा; एकपात्री नाट्य प्रयोगाचाही समावेश

भुसावळ (प्रतिनिधी):
वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “कोण होणार आवाज भीमाचा” ही भव्य भीमगीत कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आंबेडकरांच्या विचारांचा जागर करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संबोधी बुद्ध विहार प्रांगण, माता यशोधरा नगर, यशोदा हॉटेलच्या मागे, भुसावळ येथे होणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी फी २०० रुपये असून नोंदणीची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२६ आहे. आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली असून इच्छुकांनी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी. शरद भालेराव प्रस्तुत “मी सावली भिमाची” हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार असून, या प्रयोगातून डॉ. आंबेडकरांचा ज्वलंत इतिहास उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा भारतातील पहिला एकपात्री नाट्यप्रयोग असून त्याची नोंद Limca Book of Records मध्ये करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी विवेक नरवाडे (मो. 9890230030), सारंगधर केदारे (मो. 8888681962), राजू अढाळे (मो. 8329497499), संभाजी सोनवणे (मो. 9373536501), अखिलेश कुमार (मो. 9503011130), रोहित अडकमोल (मो. 9975698418), रणधीर इंगळे (मो. 7798887025), संपर्क साधावा .