भुसावळ(प्रतिनिधी)- भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील नव्याने सुरू होत असलेल्या बस स्थानकास हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे करण्यात आली आहे याबाबत नुकतेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदन दिले आहे .

भुसावळ शहरा मध्ये कोणत्याही व्यापारी संकुलास अथवा रोड ला किंवा ग्राउंडला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात आले नाही वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे देशासाठी केलेले बलिदान समाजाच्या कायम स्मरणात रहावे व येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी रहावे या हेतूने भुसावळ येथील बसस्थानकास वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यांनी दिले निवेदन
या प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत जिल्हा युवकचे अध्यक्ष संदीप राणा, जिल्हा अध्यक्ष जळगाव शहर किरण राजपूत,जिल्हा महिला अध्यक्षा सारिका पाटील ,भुसावळ तालुका अध्यक्ष कविता पाटील, जेष्ठ समाजसेवक आनंदा पाटील जिल्हा सचिव मीनाताई राजपूत ,जळगाव शहराचे युवती अध्यक्ष संजना राजपूत,माजी सैनिक परशुराम पाटील,शुभम राजपूत,आशिष राजपूत, आशिष राजपूत,अभिजित राजपूत व समाज बांधव उपस्थित होते.


