भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र या -माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)

भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी नागरिक म्हणून पुढे येत दोनही बाजूनी संय म आणि विकासाभिमुख भूमिका घेण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले आहे. नेमाडे यांनी स्पष्ट कले की, जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे आहे समितीचा निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक स्तरावर त्यासंदर्भात आरोप करणे योग्य नसून त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासाच्या प्राधान्यावर भर

नेमाडे म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकरीकांतर आपोग करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भुसावळकरांना सध्या नियमित पाणीपुरवठा, बीज, स्वच्छता, बांगले रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. शहरातील अनेक भागात १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याची स्थिती असून यासाठी घोगा नियोजन करान निश्थितज्ञापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनाचीही समस्या गंभीर बनली असून कयराकुंड्यांमधील कबरा मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर पसरत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी कोट्धनयी स्पयांचा निधी उपलब्ध असूनही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा आरोप नेमाडे यांनी केला. कामात कुचराई करणाऱ्याा अधिकान्यांवर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार नगराध्यक्षा गायत्री पंगाळे यांच्याकडे असून त्यांनी अशा न करणाऱ्यावर ग्रेट कारगाईका बडगा उगारला पाहिजे सर्व समित्यांवर भाजपाचे वर्चस्व असूनही एकही मिटिंग झालेली नाही, जनता आता आरोप-प्रत्यारोपाला कंटाळली असल्याचे सांगत त्यांनी दोधांनाही समन्वय साधण्याचे आवाहन केले.

संयुक्त समितीची मागणी

श्री. नेमाडे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी दोन पाऊले मागे घेऊन शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले, आपत्कालीन प्रश्नांसाठी साठी-विरोधकांची संयुक्त समिती स्थापन करुन तथा मध्यस्थांचा सहभाग घेऊन आमदार व मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून विकासकामांना निधी उपलब्ध करावा, अशी सूचना त्यांनी केली. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अनुभवाचाही उपयोग घ्यावा, असेही ते महणाले नगरपालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद चर्चा न होता गोधल होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत नगराध्यक्षांनी कायद्याने दिलेले अधिकार असावेत, असा सल्ला त्यांनी दिला, भुसावळ शहर हे सर्वधर्मीय आणि सर्वजातीय लोकांचे मिनी भारत असल्याचे सांगत, शहरातील सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याचे आवाहन नेमाडे यांनी केले. शेवटी, जनतेला वाद नकोत, तर सुविधा हव्यात लोकांची पिळवणूक थांबवा आणि विकासाला प्राधान्य द्या, असे ठाम मत व्यक्त करत, परिस्थिती सुधारल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी नामुष्की येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला