जळगाव – जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील आदेश शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी काढले आहेत.

जळगाव विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदाची संदीप गावीत यांच्याकडे पदोन्नतीच्या रुपात जबाबदारी येत आहे. तसेच श्रीमती दिपाली खन्ना यांच्याकडे उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई (कोकण 2) तर श्रीमती प्रांजली सोनवणे यांची पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेशन विभाग अमरावती येथे पदोन्नतीवर वर्णी लागली आहे.
संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगाव उप विभाग यशस्वी रित्या हाताळला आहे. त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याचा जळगाव विभागाला कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी चांगला फायदा होणार आहे.
जिल्ह्यात कामकाजाचा अनुभव
संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे शिवाय त्यांना जिल्ह्याची माहिती आहे शिवाय भुसावळ विभागाची धूराही 31 जुलै 2025 रोजी सांभाळली होती. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभावी काम केल्याने जिल्हावासीयांना गावीत यांच्या कार्याची पद्धत ठावूक आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याला निश्चितपणे होणार आहे.


