नशिराबाद नगरपरिषद निवडणुक: नगराध्यक्ष पदासाठी १५ पैकी १२ अर्ज वैध ; नगरसेवक पदासाठीच्या १४४ नामांकन पैकी १३० अर्ज वैध तर १४ अर्ज अवैध. –


नशिराबाद ( प्रतिनिधी ) पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामांकन अर्जांच्या तपासणी प्रक्रियेत एकूण १४४ सदस्य पदांसाठी अर्ज तर १५ नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी तपासणीनंतर सदस्य पदासाठी १३० अर्ज वैध ठरले असून १४ अर्ज अवैध ठरवण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या १५ अर्जांपैकी १२ अर्ज वैध तर ३ अर्ज अवैध असल्याचे अंतिम अहवालात नमूद आहे.

पुढील टप्प्यात वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच निवडणूक प्रचाराला आणखी वेग येणार असून नशिराबाद नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.