तापी पूर्ण बुद्धीशीय संस्थेमार्फत डोंगरगाव येथील संतापजनक घटनेचा तीव्र निषेध; दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन हादरले आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्दयी हत्येच्या घटनेबद्दल आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी येथील तापी पूर्ण बुद्धीशीय संस्थेमार्फत जाहीर निषेध करून फास्टट्रॅक मध्ये गुन्हा न चालवता डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन देत संताप व्यक्त केला आहे. या संतापजनक घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज दि. १८ रोजी येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात निवेदन दिले

निवेदनावर नंदा निकम , मनीषा पाटील , वर्षा तल्लारे यांचेसह महिलांच्या सह्या आहेत .