भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्या फौंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा
दीक्षांत समारंभ व 25-26 बॅच चे वेल कम फंक्शन दुपारी 12 ते 5 या वेळेत नुकताच श्री,व्यंकटेश बालाजी मंदिर हॉल मध्ये उत्साहात पार पडला ,
या वेळी व्यासपीठावर प्रतिष्ठा महिला मंडळच्या अध्यक्षा सौ.रजनी सावकारे, आर्या फौंडेशन चे अध्यक्ष उमेंद्र वाकचौरे व संचालिका डॉ. वंदना वाघचौरे हृद्ययम हॉस्पिटल चे संचालक डॉ. गणेश पाटील व डॉ प्रसन्ना गणेश पाटील , तसेच अरुण तायडे, सी ए दीपक मेहराणी, विजय फिरके, अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती रजनी बडगुजर , शांताराम जाधव,
लोखंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते,
सर्वप्रथम सौ रजनी सावकारेच्या हस्ते श्री.धनवंतरीची प्रतिमा पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करण्यात आले,
या वेळी डॉ. वंदना वाकचौरे यांनी त्यांच्या प्रस्तावनेने कार्यक्रमाची ची सुरुवात केली त्या म्हणाल्या महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर यावर्षी शंभर टक्के निकाल लागल्यानंतर हा दीक्षांत समारंभ घेताना आम्ही अत्याधिक उत्साही आणि आनंदी आहोत आणि एक किंवा दोन वर्षाच्या कमी कालावधीत कमी खर्चात केलेल्या कोर्स नंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असताना या गोष्टीचा आम्हाला अत्याधिक आनंद आहे, डीएमएलटी सॅनेटरी इन्स्पेक्टर रेडिओलॉजी सारखे कोर्स करण्यासाठी आता पुणें मुंबईत जाण्याची आवश्यकता नाही यासाठी आपल्या शहरातच या कोर्सची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे,
तसेच याप्रसंगी प्रतीक्षा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनीताई यांनी कोविड पिरीयड मध्ये वैद्यकीय क्षेत्राची महती जगाने पाहिली आहे आणि अगदी कमी वेळेत कमी फीमध्ये अशा कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत ही खरोखरच उल्लेखनीय बाब आहे, असे आवर्जून सांगितले , यावेळी रिदम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस साठी त्यांच्या रिदम हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले ,तसेच डॉ. प्रसन्ना पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवश्यकता पडल्यास कधीही मार्गदर्शन करतील असे आश्वासनही दिले,
प्रसंगी सी .ए दीपक मेहराणी आणि विजय फिरके यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या, यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले प्रथमच यावर्षी आर्य फाउंडेशनच्या माध्यमातून “बेस्ट ऐम्पलोयी ऑफ द इयर” या पुरस्काराने अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती रजनी बडगुजर आणि अध्ययन पॅरामेडिकलच्या ऍडमिनिस्ट्रेशनचे परवेज खान इकबाल खान यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला,


यावर्षी यावेळी अध्ययन पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन उपस्थितांची मने जिंकून घेतली,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले तर हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा समीर शेख सर दिपक बिर्हाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका मनीषा बाविस्कर यांनी सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्या फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले



