अतिवृष्टी अनुदानाबाबत असंख्य तक्रारी.. शेतकऱ्यांनी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या समवेत घेतली धरणगाव तहसीलदारांची भेट.


धरणगाव (प्रतिनिधी ) – साकरे तसेच कंडारी शिवारातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदानाबाबत असंख्य तक्रारी होत्या.याबाबत गुलाबराव वाघ यांनी साकरे गावी जात शेतकऱ्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून शेतकऱ्यांसमवेत धरणगाव तहसीलदार मा.महेंद्र सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली.साकरे तलाठी तसेच कोतवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रामुख्याने रोष होता.बऱ्याच बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता पंचनामे करण्यात आले.तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यात कमी अनुदान आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मा तहसीलदार धरणगाव यांनी समर्पक उत्तरे देत कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही व ज्यांचे नुकसान झालेले आहे किंवा कमी अनुदान आलेले आहे त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी प्रास्ताविकात संपूर्ण माहिती दिली.यावेळेस युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश आबा पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी सह पदाधिकारी तसेच साकरे, कंडारी येथील शेतकरी अरूण दादा पाटील, खुशाल पाटील,मयुर गुजर,लखीचंद पाटील, विनोद पाटील,भरत पाटील,माधव पाटील,पंकज पाटील,हारून पटेल,भिका पटेल, प्रकाश पाटील,अशोक पाटील, प्रशांत गुजर, हिरालाल गुजर,विशाल पाटील,चेतन पाटील आदी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.