भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घेराव


भुसावळ (प्रतिनिधी ) – :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये झालेल्या घोळाबाबत वारंवार मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांना दाखवून दिले त्यांचे लक्ष वेधूनही तसेच बी.एल ओ यांनी सुद्धा प्रभागात येऊन जागेवर पंचनामे करण्यास टाळाटाळ केली आहे, असा आरोप उबाठा गटाने केला आला आहे. या निष्क्रियतेविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनाचा उद्देश म्हणजे मतदारांना मतदानापासून वंचित राहू न देणे आणि प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, हा आहे. तरी मतदार बंधू आणि भगिनींना त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी व भारताची लोकशाही टिकून ठेवण्याकरिता मतदारांनी सुद्धा एक पाऊल पुढे यावं व मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उबाठा भुसावळ शहर प्रमुख गणेश चौधरी (सोनवणे ) यांनी संघटनेतील सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांना या घेराव आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.