गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था यांचा स्तुत्य उपक्रम ;

जळगाव (दि.३० जुलै प्रतिनिधी ) – शकुंतला जे प्राथमिक विद्यालय जळगाव येथे प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांचे माध्यमातून विद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल च्या डॉ. प्राची महाजन डॉ गौरव महाजन व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था यांचे दातृत्वातून सदर गणवेश वाटप करण्यात आले

.विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी भरीव योगदान या माध्यमातून झाले .सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्राची महाजन ,सौ जागृती धूत,सौ मनिषा पाटील अध्यक्षा नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था ,श्री आशीष धूत, वंदना मंडावरे,ॲड सिमा जाधव , किमया पाटील ,हर्षा गुजराथी, आशा मौर्य, स्मिता पाटील,निता वानखेडकर ,आदि उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नेहा जंगले यांनी केले सूत्र संचालन लक्ष्मी भालेराव यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल चौधरी , स्वाती जंगले यांनी प्रयत्न केले .