व्याघ्र संवर्धन जनजागृतीची सांगता बिबट्या दर्शनाने ; मी वाघ बोलतोय मानवी वाघाने संवाद साधत धरला विद्यार्थ्याबरोबर ठेका ;

पाल –
यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पाल येथे व्याघ्र संवर्धन जनजागृती चे आयोजन यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते

लालमाती येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत व पाल येथील शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यात मानवी वाघ हेमराज सपकाळे यांनी मी वाघ बोलतोय या धर्तीवर वाघाचे मनोगत व्यक्त करत वन्यजीव कसे असतात आणि कोणत्या विपरीत परिस्थितीत मानवी वस्तीत शिरतात मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळता येईल या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मानवी वाघासोबत नृत्य करत निसर्ग संवर्धनाचे धडे घेतले

अध्यक्ष रवींद्र फालक यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली, वनरक्षक राजू बोंदल यांनी वनविभागच्या प्रयत्नांना गावकरी आणि विद्यार्थ्यांनी कश्या प्रकारे सहकार्य केल पाहिजे तसेच जंगल सुरक्षित राहिल्यास त्याचा फायदा गावाकऱ्यांना कसा होईल या बाबद मार्गदर्शन केले, आश्रम शाळा तसेच वन कुट्या वरील मजूरांना चटई वाटप करण्यात आल्या


सचिव योगेश गलफाडे यांनी आभार प्रदर्शन केले. दुपारच्या सत्रात विवेकानंद प्रतिष्ठान च्या सहभागी विदयार्थ्यांसोबत पाल येथील सफारी गेट जवळ 100 भारतीय रोपांचे रोपण केले गेले तसेच वाशीम येथील कोब्रा अडव्हेन्चर संस्थेचे आकाश आहाले यांनी आणलेल्या 200 सीड बॉल विद्यार्थ्याच्या हस्ते सफारी मार्गांवर टाकण्यात आल्या
सफारी गेट मधून 2 किलोमीटर अंतरावर शब्बीर तडवी यांच्या सफारी वाहनास बिबट्या चे दर्शन झाले ते बघून विद्यार्थी भारवले तसेच सर्वांनाच मोर लांडोर यांचे दर्शन झाले सायाळ आणि तिचे 3 पिलं यांचा मुक्त संचार मनमोहक होता वन्यजीव संस्थेच्या व्याघ्र दुतांना तडस आणि सायाळ चे दर्शन झाले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि यावल उपवन संरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात सफारी चे काम सुरु झाल्या पासून या भागाला विशेष संरक्षण प्राप्त झाले आहे भविष्यात याचा फायदा येथील वन्यजव अधिवास वाढण्यास होणार आहे असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांनी संगितले
सहभागी व्याघ्र दूत, वनकर्मचारी, आणि विद्यार्थ्यांना सहभाग पत्र देऊन गौरवण्यात आले, संस्था उपाध्यक्ष सतीश कांबळे, प्रदीप शेळके, मुकेश सोनार यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल वनविभागाचे वनपाल अरुणा ढेपले, वनरक्षक राजू बोण्डल, सुपडू सपकाळे सविता वाघ, मुकेश तडवी, जगदीश जगदाळे, संजय राजपूत, आयेशा पिंजारी, आश्रफ तडवी, हेमलता बारेला, उषा बारेला, यांनी परिश्रम घेतले.वन्यजीव संस्थेचे बाळकृष्ण देवरे, सतीश कांबळे, योगेश गालफाडे, रवी भोई, अजीम काझी,निलेश ढाके, राजू गुप्ता, विकास गायकवाड, राजेंद्र वाघ, दिनेश सपकाळे, ऋषीं राजपूत, समाधान गोसावी, स्कायलेब दिसूझा यांनी सहकार्य केले.