भुसावळ तालुका सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीबाबत 8 जुलै रोजी सोडत सभा ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील एकूण 39 ग्रामपंचायतीमधे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण बाबत सोडत सभा दिनांक 08/07/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता तसेच महिला सरपंच पद आरक्षण सोडत सभा दिनांक 09/07/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता तापी सभागृह, मा. उपविभागीय अधिकारी भुसावळ भाग भुसावळ कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर सभेस गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी उपस्थित रहावे, याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.