भुसावळ (प्रतिनिधी ) – पावसाळ्यापूर्वी भुसावळ शहर स्वच्छ आणि मोकळे करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. याकरिता रिक्षा दिवसभर फिरवून अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना देण्यात आली होती, अन्यथा नगरपालिका कारवाई करेल असे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी शहरात धडक कारवाई सुरू केली आहे.


