भुसावळ येथील आर्या फौंडेशनला शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाचा कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार”

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील आर्या फौंडेशनला शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय
यांच्या मार्फत ‘कर्मवीर पदमश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार” सन २०२३-२४ साठी जाहीर झाल्याचे पत्र सामाजिक न्याय विभागाकडून त्यांना पत्र प्राप्त झाले होते

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री , एकनाथजी शिंदे, सामाजिक न्याय मंत्री , संजयजी शिरसाट, डॉ हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आला
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की सामाजिक न्याय विभागाकडून 23-24 साली महाराष्ट्रातुन विभागीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते।,
संपूर्ण महराष्ट्रातुन जवळपास 1100 प्रस्ताव आलेले, त्यातून50 व्यक्तिगत व 40 संस्था साठी असे एकूण 90
अतिशय सन्मानाचे समजले जाणारे
प्रस्ताव पारित झाले,
आणि सामाजिक न्याय विभागाकडून
हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते
मंगळवार, दिनांक १० जून, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमण पॉइन्ट, मुंबई येथे अतिशय हर्षल्हासित वातावरणात हे पुरस्कार
प्रदान करण्यात आले,
यात शिल्ड, शाल ,श्रीफळ ,प्रमाणपत्र, धनादेश, प्रदान करण्यात आला,
या वेळी सामाजिक न्याय विभागाचे आभार मानतांना आर्या फौंडेशन चे अध्यक्ष श्री उमेंन्द्र वाघचौरे व डॉ वंदना वाघचौरे म्हणाल्या की सामाजिक क्षेत्रात कार्य करतांना आशा पुरस्काराने जेव्हा कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा कार्य करण्याची उर्मी येते।
अतिशय आनंदी वातावरणात
या पुरस्काराचे संपुर्ण श्रेय ते आपल्या परिवाराला आणि आर्या फौंडेशन च्या संपूर्ण टीम ला देतात ।।