भुसावळ (प्रतिनिधी ) – सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ येथून पंढरपूर वारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यामार्फत मोफत विशेष रेल्वे गाडी 5 जुलै रोजी सोडण्यात येणार आहे. वारकर्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

रावेर लोकसभा क्षेत्रासह जळगाव व बुलडाणा जिल्हा परिसरातील वारकरी व भाविकांसाठी रेल्वेतर्फे पंढरपूर वारीसाठी अनआरक्षित विशेष आषाढी रेल्वे गाडी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने उपलब्ध करून देण्यात येत.े संपूर्ण गाडीच्या तिकिटांचा खर्च केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यातर्फे करण्यात येत असतो. यावर्षी सुद्धा आषाढी एकादशीनिमित्त मोफत विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.
आषाढी एकादशी मोफत विशेष गाडी शनिवार, 5 जुलै रोजी भुसावळ स्टेशन येथून रवाना होइर्ग्ल. या गाडीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे हिरवी झेंडा दाखवून रवाना करतील तर रविवार, 6 जुलै रोजी पंढरपूर येथे गाडी पोहोचल्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या सुमारस परतीसाठी निघणार असल्याबाबत मध्य रेल्वे मार्फत कळविण्यात आले आहे. लवकरच सदर विशेष रेल्वे गाडीचा टाईमटेबल व थांबे कळविण्यात येणार आहे.


