डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नमा शर्मा यांनी केले ११ किलो बुंदीचे लाडू वाटप.

भुसावळ – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने शहरातील शिवसेनाव उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शिव भोजन केंद्र संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांनी गोरगरिबांना ( बुंदीचे लाडू, वरण भात, पोळी )अन्नदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

ब। या अन्नदानाचा गोरगरिबांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सकाळ पासुन बुंदीचे लाडू वरण भात आणि पोळी वाटप सुरू करण्यात आले होते.
शिव भोजन केंद्र संचालक नमा शर्मा हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज जयंती , रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच गजानन महाराज प्रगट दिन, हनुमान जयंती, अशा विशिष्ट दिवशी गोरगरिबांना जेवणा सोबत गोड पदार्थांचे अन्नदान करीत असतात. आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून सण उत्सवाचा गोरगरिबांना देखील आनंद घेता आला पाहिजे या मुख्य उद्देशाने गोरगरिबांना मोफत अन्नदान करीत असल्याचे नमा शर्मा यांनी यावेळी सांगितले.

प्रसंगी रमारत्न फाऊंडेशन संचलित क्रांती आई सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना सुभाष शेळके, आरपीआयचे जिल्हा नेते सुदाम सोनवणे, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष विजय साळवे,काँग्रेसचे शहर अध्यक्ष रविंद्र निकम, यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी अप्पा मोरे, आरपीआयचे भगवान निरभवणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, काँग्रेसचे सरचिटणीस संतोष साळवे, राजु डोंगरदिवे, रहिम गवळी, पँथरचे सिद्धार्थ सोनवणे, आदी उपस्थित होते.