उभ्या केळीच्या बागेवर भामट्याने तणनाशक मारून हजार खोड केले जमीनदोस्त; तब्बल पाच लाखाचं झालं नुकसान

भुसावळ (प्रतिनिधी ) -शहराजवळील साकेगाव शिवारामध्ये रेल्वे लाईनला लागून असलेल्या अजीम सलीम पटेल या शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास अर्थात हजार केळीच्या खोडला भामट्याने रात्रीच्या वेळेस तन नाशक मारुन जमीन दोस्त केले. यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून तब्बल बाजारभाव प्रमाणे सहा लाखाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. साकेगाव रेल्वे लाईन लगत सर्वे नंबर ४३० मध्ये ३ एकर क्षेत्रामध्ये अजीम सलीम पटेल या शेतकऱ्याने कर्ज काढून व हात उचलणारी घेऊन केळीचे पाच हजार रोप लावले अज्ञात भामट्याने रात्रीच्या वेळेस तब्बल हजार केळीच्या झाडांवर (खोडांवर) तणनाशक मारून खोडांचा नुकसान केले. यामुळे अजीम पटेल यांचे तब्बल पाच ते सहा लाखाचे बाजार भाव प्रमाणे नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही दुसरीकडे निसर्ग वेळोवेळी सास सोडून पिकांचे नुकसान करते. अशातही शेतकरी कबाड कष्ट करून शेती करतात पटेल यांचे लावलेले पीक हाताशी आले असताना भामटे पिकांचे नुकसान करण्याच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याशिवाय परिसरामध्ये जनावरांचा देखील त्रास आहे. यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. तो भामटा कोण ? तो कुठून आला? गावापासून तर शेतापर्यंतचे असलेले गोपनीय सीसीटीव्ही पायांचे ठसे, तसेच तज्ञ श्वान द्वारे या भामट्याचे तपासले लावण्यात येणार असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले. दरम्यान गावातील इतरही हे शिवारामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याबाबत गोपनीय माहिती द्वारे देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.