चंद्रपूर –

व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सायबर साधनांचा उपयोग तरुणी कुठल्या दिशेने करीत आहेत ? याचे चिंतन करायला लावणारी एक घटना मूल पाेलिसांच्या प्रयत्नाने तडीस गेली. सायबर साधनांचा चुकीचा वापर विघातक ठरत असल्याचे अनेक दाखले वारंवार बघायला मिळत असताना याच पार्श्वभूमीवर मूल पाेलिस ठाणे क्षेत्रातील ही घटना चिंतन करायला लावणारी ठरते.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मूल तालुका हद्दीत येथील पाेलिस स्टेशन अंतर्गत येणारी घटनेचा सायबर सेलच्या सहकार्याने ‘फ्रेंडरिक्वेस्ट’ ला बळी पडून, झपाटल्यागत आसाम राज्यात निघून गेलेल्या युवतीला शाेधून पालकांच्या स्वाधीन केले. सायबर सेलच्या माध्यमातून मूल पाेलिसांनी युवतीला सुखरूप सुरक्षित घरी पाेहाेचविले. महाविद्यालयीन युवतीला सुरक्षित भविष्य बहाल करणारी ही घटना दखलपात्र, पाेलिस विभागाचा सन्मान वाढविणारी तर आहेच, तेवढीच सायबर मिडीयाचा दुरूपयोग करणाऱ्यांना चिंतन करायला लावणारी आहे.
चंद्रपूर येथील मुल तालुक्यात एका महाविद्यायात प्रथम वर्षात शिकत असलेली होतकरू ईसमाची मुलगी ही सकाळी महाविद्यालयात गेली परंतू सायंकाळी घरी न परतल्याची फिर्याद घेऊन मूल पाेलिस स्टेशन गाठून फिर्याद नाेंदविली. या प्रसंगी पाेलिस ठाणे प्रमुख तथा परिविक्षाधीन पाेलिस उप अधीक्षक प्रमाेद चौगुले यांनी या दखल पात्र फिर्यादीनुसार संबंधाने पाेलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्याशी सल्लामसलत करून शाेधपथक तयार केले. यात पाेलिस सपाेनि. सुबोध वंजारी, महिला पाेलिस उप निरीक्षक वयात नैतिक, पाेहवा भाेजराज मुंडे, पाेअं संदिप चुधरी यांचा समावेश करण्यात आला.
यावेळी शाेधपथकाने पोलीस प्रमुखांचे मार्गदर्शनात सायबर सेलच्या मदतीने मुलीचे माेबाईल नंबर वरून लाेकेशन मिळविले. लाेकेशन आसाम राज्यातील कचर जिल्ह्यात असल्याचे आढळल्याने अति. पाेलिस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व परिविक्षाधीन पाेलिस उप अधीक्षक याचे मार्गदर्शनात आसाम राज्यातील कचर जिल्हा पाेलिस अधिक्षक व संबंधित पाेलिस अधिकारी यांना या लाेकेशन नुसार शाेध मोहिमेस राबविले.
तपासाचे चक्र अतिशय जलद गतीने मूल पाेलिसांनी फिरवली तसेच ठोस पाऊले उचलुन आसाम राज्यातील उंदरबाेड पाेलिस ठाणे अंतर्गत मुलीचा शाेध लागला असता तपास करीत मूल ठाणे शाेध पथक लगेच आसाम राज्यातील कचर जिल्ह्यात पाेहाेचले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून मुलीला साेबत घेऊन शाेध पथक परतले. सदर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर अर्थातच आनंद झळकला अशा खरच कौतुकास्पद कार्याने पाेलीसांचे सर्वत्र काैतुक हाेणे स्वाभाविक आहे.
समजा पोलीस विभागाने मनावर घेतले तर असंख्य फिर्यादी आनंदी होतील असे घटलेल्या घटनेवरून लक्षात येते. अशाच घटनेनंतर महाविद्यालयीन युवतीने कथन केलेली आपबिती व व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर या सायबर साधनांचा बेजबाबदारपणे केलेला वापर स्वताला व संपूर्ण कुटुंबाला दु:खात ढकलतो अन् सामाजिक स्वास्थ्य दूरगामी बिघङते. या संबंधाने दिलेला संदेश मार्मिक व चिंतनीय ठरताे.
मूल पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने दिलेला संदेश बाेलका ठरताे. “फ्रेंडरिक्वेस्ट “च्या चक्रव्यूहात पुढे युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविले जाते, पुढे आत्महत्येच्या धमक्या, ब्लॅकमेलिंग, फसवणूक……! अशा अनेक दुदैवी घटनाक्रमातून युवतींना जावे लागते. तरूणी, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वतःला सांभाळावे, हा संदेश सदर युवतीने दिला आहे.



