वरणगाव येथील जवानाचे हृदयविकाराने मृत्यू ; २७ रोजी होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ;

वरणगाव – शहरातील सिध्देश्वर नगर मधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर (३५) यांचे आसाममधील लेखपली येथे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

स्व. अर्जुन बावस्कर हे कर्तव्यपरायण आणि शिस्तप्रिय सैनिक होते. आपल्या सेवेत कायम तत्पर असलेल्या या जवानाच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक यांच्यात शोककळा अप्सरली आहे. आहे.

अर्जुन बावस्कर हे गेली तेरा वर्षा पासून देशाच्या विविध भागात देशसेवा बजावत होते त्यांच्या सेवानिवृतीला दोन वर्ष बाकी असताना त्यांचे अकस्मत निधन झाले
त्यांचा अंत्यविधी दि. २७ मार्च रोजी गुरुवारी, त्यांच्या राहत्या घरी सिद्धेश्वर नगर येथून निघून शहरातील मुख्य स्मशानभूमीत शासकीय इतमामात पार पडणार आहे. त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले व इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.