नाहाटा महाविद्यालयात एक दिवसीय स्पेक्ट्रोस्कोपी सेमिनारचे आयोजन:

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, रसायनशास्त्र विभागातर्फे, वार्षिक एक दिवसीय सेमिनार ऑन स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स (SST-2025) चे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनार चे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन श्री. महेश फालक, सचिव श्री. विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष श्री. संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटिल, उप प्राचार्य उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डी. एन. पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. येवले आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या उद्घाटनपर अध्यक्षीय भाषणात डॉ. मोहन फालक यांनी स्पेक्स्ट्रोस्कोपी मधील संशोधनाचे महत्व विषद केले आणि त्यामुळेच स्पेक्ट्रोस्कोपीचा त्याचा नियमित शैक्षणिक आभ्याक्रमात असलेला सामावेश केलेला असल्याचे सांगितले. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्पेक्ट्रोस्कोपीचा योग्य वापर करून नाविन्यपूर्ण संशीधन किती गरजेचे आहे आणि येणाऱ्या पिढीने स्पेक्ट्रोस्कोपी मधील नवनवीन संशीधनाला चालना देऊन आणि त्याचा वापर करून समाजात योगदान देण्याचा प्रयत्न कारावा असे प्रतिपादन केले .
या सेमिनार मध्ये, डॉ. व्ही. एन. महिरे यांनी विद्यार्थ्यांना आय आर स्पेक्ट्रोस्कोपी वर मार्गदर्शन केले. डॉ. सी. एच. सरोदे यांनी एन. एम. आर. या स्पेक्ट्रोस्कोपीतील पद्धतीबद्दल माहिती दिली तसेच डॉ. ए. डी. क्षिरसागर यांनी मास स्पेक्ट्रोस्कोपी या विषयावर मार्गदर्शन केले. तीनही सत्रांमध्ये विध्यार्थ्यांना स्पेक्ट्रोस्कोपी मधील विविध न्यूमरिकल प्रॉब्लेम कसे सोडवले जातात यावर विस्तृत माहिती दिली गेली. कबचौ उमवि परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील एकूण १८६ विद्यार्थ्यांनी या सेमिनार मध्ये सहभाग नोंदविला.
या सेमिनार च्या उद्घाटन प्रसंगी विभागप्रमुख डॉ. एस. डी. येवले यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी सांगितले की स्पेक्ट्रोस्कोपी शी निगडित संशोधनाला १० पेक्षा जास्त नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संगीता भिरूड यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ. उमेश फेगडे, डॉ. निलीमा पाटिल, डॉ. सचिन कोलते, तेजस्विनी पिसाळकर, धनश्री बर्डे आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असे प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रशांत पाटिल यांनी कळविले.