नाहाटा महाविद्यालयात नृत्यस्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न


भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे कला मंडळ अंतर्गत नृत्यस्वरांजली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. नृत्यस्वरांजली स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ताप्ति एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष . डॉ. मोहन फालक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक , संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, संस्थेचे कोषाध्यक्ष. संजयकुमार नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.ब-हाटे, उपप्राचार्य प्रा.डी.एन. पाटील, कला मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ.आर.एस.नाडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक म्हणाले की, विद्यार्थी जीवनात अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी इतर कलागुण आत्मसात केले पाहिजे. त्यांच्या या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नृत्य स्वरांजली मार्फत त्यांचे कलागुण सादरीकरण केले जात आहे. अध्यक्ष मोहन फालक यांनी विद्यार्थ्यांविषयी गुण गौरव करून प्रोत्साहन दिले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलामंडळ चेअरमन डॉ. आर. एस. नाडेकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात कला मंडळातील वर्षभरातील विविध कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. नृत्यस्वरांजलीचे पार्श्वभूमी मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सी. एच. सरोदे यांनी केले. नृत्यस्वरांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन, समूहगीत, देशभक्तीपर गीत, मल्याळम गीत, मराठी गीत, लावणी , यासह विविध नृत्यप्रकार सादर करून विद्यार्थ्यानी प्रेक्षकांची दाद मिळवली.
नृत्यस्वरांजली कार्यक्रमात विविध कला गुणांवर आधारित नृत्य, गायन, वादन सादर करण्यात आले. शेवटी युथ फेस्टिवल मध्ये सादर झालेले डांगी नृत्य झाले. शेवटी बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपन्न होऊन विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.कलाप्रकार व क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष डॉ.मोहन फालक, कोषाध्यक्ष विष्णू चौधरी, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.ब-हाटे, प्रा.डी.एन.पाटील यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ.स्वाती फालक आणि प्रा. अक्षरा साबळे यांनी काम पाहिले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पूनम महाजन यांनी केले.