ताप्ती पब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

भुसावळ: येथिल ताप्ती पब्लिक इग्लीश मिडीयम स्कूल मध्ये पोलीस अधीक्षक डाँ.महेश्वर रेड्डी यांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमा खाली नवीन कायदे मार्गदर्शन या संदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यात भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे नवीन कायदे,तसेच जुन्या कायद्या मधील केलेल्या सुधारणा या बद्दल जनजागृती करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यात मोटार वाहन कायदा,पोस्को कायदा,सायबर सुरक्षा आय.टी.अँक्ट, यामधील काही महत्त्वाच्या कलमाचा समावेश केला होता.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ,उपनिरीक्षक राजू सांगळे,ज्येष्ठ सरकारी वकील मोहन देशपांडे,राजीव तडवी हे उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना वरील कायद्यांची माहिती दिली.तसेच आपले कर्तव्य व सुजाण नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी
प्रिंसीपल नीना कटलर,व्हाईस प्रिंसीपल मनप्रीत कौर,श्रद्धाली घुले यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना कायद्या संदर्भात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ तर व्यासपीठावर निना कटलर,राजू सांगळे, जेष्ठ सरकारी वकील मोहन देशपांडे,राजीव तडवी आदी दिसत आहे.