भुसावळ – आर्या फाउंडेशन संचलित
हिरकणी महिला मंचच्या माध्यमातून महिलांना सायबर सुरक्षा व सायबर गुन्हेगारीचे मार्गदर्शन करून अतिशय उत्साहात हळदीकुंकू साजरा केला.
दिवसेंदिवस वाढत चाललेली सायबर गुन्हेगारी लक्षात घेता , महिलांनाही त्याचे ज्ञान असावे हे लक्षात घेऊन हिरकणी महिला मंच ने यावर्षी महिलांना सायबर गुन्हेगारीचे ज्ञान देऊन वेगळ्या पद्धतीने हळदीकुंकू साजरा करण्याचे ठरवले ,
व्यासपीठावर MKCL ( MAHARASHTRA KNOWLEDGE CORPORATION LIMITED च्या प्रतिनिधी धनश्री अट्राववलकर ,प्राची चौधरी
आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाकचौरे अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्या रजनी बडगुजर मॅडम तसेच हिरकणी महिला मंचच्या अनिता खरारे व आशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान दिनांक 2 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी दोन वाजता हिरकणी महिला मंचचा हळदीकुंकू उत्साहात साजरा झाला. डॉ. वंदना वाकचौरे यांनी आपल्या प्रस्तावनेत हिरकणी महिला मंचच्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्ट संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले आणि सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे त्यासाठी अशा पद्धतीचे हे कार्यक्रम होणे आवश्यक आहे व महिलांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे यासाठी हा वेगळा आगळा कार्यक्रम आम्ही घेत आहोत असे समजून सांगितले एमकेसीएलच्या धनश्री अट्रावलकर यांनी दिवसेंदिवस वाढत चाललेली सायबर गुन्हेगारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले कशा पद्धतीने महिलांना या सायबर च्या जाळ्यामध्ये ओढलें जाते आणि sexortation ला कशा रितेने महिला बळी पडतात,अशावेळी आपली सुरक्षितता कशा पद्धतीने हाताळता येईल यावर सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना समजावून सांगितले,
त्यानंतर प्राची चौधरी यांनी काळाची गरज डिजिटल भगवद्गीतीचे अतिशय सुंदर रीतीने प्रात्यक्षिकासह प्रेझेंटेशन दिले व महिलांना मंत्रमुग्ध केले,
त्यानंतर सर्व महिलांना हळदीकुंकू आणि वाण देण्यात आले, या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या फाउंडेशनच्या ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या मनीषा बाविस्कर यांनी केले ,आणि शेवटी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या प्राचार्य श्रीमती रजनी बडगुजर यांनी सर्वांचे आभार मानले या अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना झा
अश्विनी कासार लीना पाटील हर्षा तायडे,
ज्योती घारू यांनी केले।



