भुसावळ येथे विषारी औषध सेवन केलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू ! –

भुसावळ – तालुक्यातील चोरवड येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरु असताना २ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,चोरवड येथील दीपक प्रल्हाद पाटील (वय ३०) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील चोरवड गावात दीपक पाटील हा आईसोबत वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्याने गावातील विठ्ठल मंदिराजवळ विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता दीपक पाटील याचा मृत्यू झाला.

या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत दीपक पाटील याच्या पश्चात आई सरूबाई, मोठा भाऊ संतोष आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.