भुसावळ – शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही मध्यरात्री गोतस्करां कडुन गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांनी निवेदन दिले . दिनांक 30/1/25 या रोजी प्रांत कार्यालयावर गोरक्षक व नगरसेवक पिटु ठाकुर यांनी प्रांत निवेदनाद्वारे शहरातील गोतस्करीचा रात्रीला होणारा प्रकार सांगितला विविध प्रकारचे शस्त्र बाळगत राज्यगोमातेला इंजेक्शन देत बेशुद्ध करत कार मध्ये कोंबुन कत्तल करतात घडलेला प्रकार थांबविण्यासाठी गेले असता हत्यारे शस्त्र दाखवित पळ काढतात असा प्रकार देखील घडतो आजही गोमाता व गोवंशाची हत्या होत असून कसाई मांस विक्री करतात मात्र आजही हे कसाई मोकाटच आहे ही शोकांतिका आहे

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील एकाच रात्री 10 गायी चोरीस गेलेल्यांची घटना घडली आहे गोतस्कर कसाई याला कोणाची साथ आहे याचा शोध घेऊन कसाई सोबत मदत करणारे वर कठोर शासन व्हावे असेही निवेदनात गोभक्तांनी मागणी केलेली आहे गोभक्त नगरसेवक पिंटुभाऊ ठाकुर सोनु अग्रवाल राजु इंगळे रोहित महाले बल्लु धायडे तेजस रणधींर साहिल पाटील लोकेश चौधरी पियुष भोई पुर्वेश कोळी नैतीक कोळी पियुष कोळी रुपेश भोई दुर्गेश पाटील आदी उपस्थित होते


