भुसावळ – भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कार्यानिमित्त प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज-II) आणि नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामांमुळे काही गाड्या रद्द करण्यात येणार असून काही पुन: निर्धारित केले जाणार आहे. ट्रेन परिचालन वर परिणाम खालील प्रमाणे आहेत.

दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द झालेल्या गाड्या:
• गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक एक्सप्रेस
• गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक – बडनेरा एक्सप्रेस
• गाडी क्रमांक ११११३ देवळाली – भुसावळ एक्सप्रेस
• गाडी क्रमांक ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस
दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द झालेल्या गाड्या:
• गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक एक्सप्रेस
• गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक – बडनेरा एक्सप्रेस
• गाडी क्रमांक ११११३ देवळाली – भुसावळ एक्सप्रेस
• गाडी क्रमांक ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस
पुन: निर्धारित गाड्या (04 फेब्रुवारी 2025 रोजी):
• १२८५९ मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस मुंबई येथून ०२.०० तास उशिराने सुटेल.
• २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कॅट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०२.०० तास उशिराने सुटेल.
• १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०१.०० तास उशिराने सुटेल.
ही कामे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे.


