शिवसेना शाखा गावागावात निर्माण करा-भुसावळ तालुका बैठकीत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

वरणगाव – शिवसेना (शिंदे गट) च्या शाखा भुसावळ तालुक्यातील गावागावात निर्माण करा आणि सदस्य नोंदणीही जास्तीत जास्त करा असे आवाहन रावेर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या शिवसेना तालुका आढावा बैठकीत पदाधिकाऱ्याना केले.

सुरुवातीला प्रयागराज येथील महाकुंभ मधील चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख समाधान महाजन महिला जिल्हा संघटिका नंदा निकम, तालुका समन्वयक सुरेश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक हमीद खान, सय्यद हिप्पी सेठ, प्रकाश निकम, भुसावळ शहरप्रमुख पवन नाले, युवा सेना जिल्हा युवाधिकारी पवन भोळे, वर्षा तल्लारे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात संतोष माळी यांनी बैठकीतील विषय सांगितले. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी काळात गावा गावात शाखा आणि सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला तालुका संघटक प्रशांत पाटील, युवा तालुकाप्रमुख राहुल वंजारी, वरणगाव संघटक दुर्गेश बेदरकर, सामाजिक न्याय विभाग आघाडीचे मेजर, सुनील देवघाटोळे, फिरोज खाटिक, प्रल्हाद माळी, संतोष थामेत, भुसावळ शहर संघटक मयुर सुरवाडे, उप शहरप्रमुख किरण महाले, उप शहर संघटक सौरभ पवार, यशवंत बोरीकर, युवा सेनेचे हर्षल जैन, विठ्ठल जाधव, तेजस वंजारी, अंकुश ब्राम्हणे, रुपेश चावरीया, जितेंद्र धोबी, नितीन पाटील आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.