थोर लेवा पंचायत समितीतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ – येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात थोरगव्हाणकर लेवा पंचायत समिती तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती चौधरी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मंगला पाटील , स्वाती भोळे ,कल्पना शिंदे , संगिता पाटील, मिना लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमात सर्वप्रथम दिप प्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी उपस्थीत महिलांना तिळगुळ , भेट वस्तु देवुन , औक्षण करून हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला .
महिला साठी संगीत खुर्ची व इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .
यावेळी एका महिला भगिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला .
याप्रसंगी आरती चौधरी यांनी सांगितले कि दिवसभरातील घडामोडी तील चांगल्या गोष्टी चे मनन करावे इतर विसरून जावे तेव्हा सुखाने झोप येते , तर मंगला पाटील यांनी महिलांनी सक्षम होण्याची गरज असल्याचे सांगितले .
तर संगिता पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली दिनेश पाटील , माधुरी संजय चौधरी , शैला कोलते , वैशाली चौधरी , दिपमाला चौधरी दर्शना झोपे ,पल्लवी झोपे आणि पल्लवी राजेश झोपे आदीसह थोर महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .