पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? तीन्ही मंत्री दावेदार ; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता कायम;


जळगाव ः महायुती सरकारच्या नवीन
मंत्रिमंडळातील अकरा पैकी तीन आमदारांना स्थान देण्यात आले आहे. यात भाजपाने जिल्हयात दोन मंत्री तर शिंदे गटाने एक मंत्री दिलेला असुन अजित पवार गटातील अनिल पाटलांना यंदा मंत्रीपदाची हुलकाणी मिळाली आहे.

तीन्ही मंत्री दावेदार ; खाते वाटपाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता कायम;
मंत्रीपदाची शपथ तिन्ही नेत्यांनी घेतली असुन आता जिल्ह्याची धुरा कुणाकडे? पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळेल याची चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगु लागली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्यावेळी गुलाबराव पाटील यांच्याकडे होते. तत्पुर्वी युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे परभणीचे पालकमंत्रीपद होते. त्याच बरोबर काही काळ मंत्री गिरीष महाजन यांनी देखील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुषवले असुन गेल्या काही वर्षापासुन नाशिकसह नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळाले होते.तसेच आघाडीचे सरकार असतांना १२ वर्षांपुर्वी संजय
सावकारे यांच्याकडे राज्यमंत्री पदासोबतच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होते. त्यामुळे यंदा तीन ही मंत्री जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्याची शक्यता आहे.
खाते वाटपाबाबत चर्चा रंगल्या जिल्ह्याला तीन कॅबीनेट मंत्रीपद कायम राहीले असुन आता या तीन ही मंत्र्यांना कोणती खाती मिळतात याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे यापुर्वी युतीचे सरकार असतांना व महायुतीचे सरकार असतांना पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते होते.
त्यामुळे त्यांच्याकडे हे खाते त्यांच्याकडे कायम राहील
पालकमंत्री भाजपाचा कि शिवसेनेचा
जिल्ह्यात भाजपाचे सहा आमदार तर शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले आहे, त्यामुळे पालकमंत्री भाजपाचा होणार कि शिवसेनेचा याबाबत उत्सुकता आहे. जिल्ह्याच्या पातळीवर पालकमंत्री सर्वोच्च असतात. जिल्हा नियोजन समितीतून निधी वाटपापासून ते प्रशासकीय
कि नाही याबाबत उत्सुकता आहे. कार्यकर्त्यांमध्ये मात्र परिवहन मंत्री पदाची चर्चा रंगू लागली आहे. गिरीष महाजन यांच्याकडे ग्रामविकास, पर्यटन ही महत्वपुर्ण खाती होती. मात्र आता त्यांना तेच खाते मिळतात कि मोठी जबाबदारी मिळते याकडे लक्ष आहे. कार्यकत्यांमध्ये मात्र त्यांच्याकडे महसुल मंत्रीपद मिळेल असे सांगण्यात येत असुन मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाचे असल्याने गृह खाते देखील त्यांना मिळू शकते असा अंदाज कार्यकर्ते व्यक्त करत आहे. संजय सावकारे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जो पर्यंत खाते वाटप होत नसली तरी कार्यकत्यांकडून जिल्ह्याचे नेतृत्व कुणाकडे हे लवकरच अंदाज बांधले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंतचे अधिकार पालकमंत्री यांनाच असतात. जिल्ह्यातील प्रशासनावर त्यांची पकड असते. निधी वाटपापासून ते प्रशासनापर्यंत त्यांचा अधिकार चालतो. पालकमंत्री यांना जिल्ह्याचे मुख्यमंत्रीच मानले जाते. त्यामुळे
समजणार आहे.