रेल्वेतील चोरीच्या १९८ पैकी १०० घटनांमधील मुद्देमाल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाला यश ;

भुसावळ : रेल्वे प्रवास करत असताना सामानाकडे क्षणभरही नजर चुकली तर हमखास चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडे प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाच्या हद्दीत जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १९८ चोरीच्या घटना घडल्या, मात्र रेल्वे पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवत तब्बल १०० चोरीच्या घटनातील मुद्देमाल जप्त केला आहे, ही विशेष बाब होय.रेल्वेत प्रवास करत असताना सामान्य डबा असो की, स्लीपरक्लास की एसी डबा… प्रत्येक डब्यामध्ये सातत्याने चोरीच्या घटना होताना दिसून येत आहेत. यामध्ये विशेषतःचोरीस गेलेला व हस्तगत माल०२जानेवारी१३४फेब्रुवारी१४०३मार्च१९एप्रिल२०मे१७जून२३जुलै१२०६ऑगस्टसप्टेंबर२७०६ऑक्टोबर २२०२५६नोव्हेंबर १२ एकूण १९८मोबाइल, पर्स, सुटकेस तसेच महागड्या बुटांचाही समावेश आहे.चोरीमध्ये तरबेज असलेले रेल्वेतले चोर हे कोणत्या स्थानकावर गर्दी आहे, कोणत्या डब्यामध्ये जास्त सामान आहे, किती प्रवासी झोपलेले आहेतयाची माहिती सातत्याने घेत असतात. तसेच चोरीनंतर कोणता प्लॅटफॉर्म येण्याच्या आधीच आऊटरवर उतरावे याचीही त्यांची चांगलीच तालीम झाल्याचे चोरीच्या घटनांवरून दिसून येते.नजर हटी, दुर्घटना घटी..प्रवासादरम्यान सहज कोणीही प्रवासी मोबाइल चार्जिंगला लावतो. तसेच सामान, पर्स इत्यादी वस्तू आपल्या सीट व सीटच्या खाली ठेवून काही मिनिटांसाठी वॉशरुम किंवा इतरांशी गप्पा मारत असतात. रेल्वेतील एक्सपर्ट चोर हे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात व जशी त्यांची आपल्या साहित्यावरून नजर हटली अर्थात इकडे तिकडे बोलण्यामध्ये मग्न झाले किंवा वॉशरूमला गेले तितक्याच वेळेत चोर शिताफीने आपले चोरीचे काम करतात.गेल्या ११ महिन्यांत तब्बल १९८ छोट्या-मोठ्या प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या. यातील तब्बल चोरीला गेलेले १०० मुद्देमाल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिसांना रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने यश मिळाले आहे.