अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दोन वेळचे जेवण ज्यांना मिळत नाही अशा आदिवासीं पाड्यावर फूल आणि फुलाची पाकळी म्हणून सत्कर्माचा वाटा उचलत नारीशक्तीने प्रज्वलित केला दिवाळीचा दिप….
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देवसिंगपाडा, व रामजी पाडा उनपदेवगेट जवळ अडावद येथे मोठ्या स्वरूपाचा फराळ वाटप व महिला भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या. एकूण १५० कुटुंबांना फराळ व साड्या वाटप कऱण्यात आल्या


.या गरीब कुटुंबांसाठी दिवाळीचा आनंद गगनात मावेनासा झाला. अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी प्रास्तविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी नारीशक्तीच्या या उपक्रमाचे सलग पाचवे वर्ष असून गरीब व वंचितांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असतो असे सांगितले. एकूण १५० कुटुंबांना प्रत्येकी साडी ,अर्धा किलो चिवडा ,अर्धा किलो मिठाई वाटप नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली.तसेच लहान मुलांना फुलझडी ,चॉकलेट, बिस्कीट वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. यासाठी नारीशक्ती बहुउद्देशय संस्थेच्या पदाधिकारी एडवोकेट सीमा जाधव, नूतन तासखेडकर, किमया पाटील, मंजुषा अडावदकर, रेणुका हिंगू ,हर्षा गुजराती, आशा मौर्य , वंदना मंडावरे,
प्रेमराज पावरा,लक्ष्मण चौधरी आदी. उपस्थित होत्या. उपक्रमास मार्गदर्शन अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा अडावदकर यांनी केले आणि आभार श्रीमती ज्योती राणे यांनी मानले.



