नेपाळ बस दुर्घटना : बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा निश्चित नाही ! – मंत्री गिरीश महाजन : आमदार संजय सावकारे यांनी अपघातग्रस्त जखमींशी व्हिडीओ कॉल करून साधला संवाद ;

भुसावळ – आमदार संजय सावकारे यांनी देखील तातडीने अपघातात जखमी झालेल्यांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधून त्यांना धीर दिला. सुत्रांच्या माहितीनुसार आमदार संजय सावकारे हे तातडीने विमानाने नेपाळ येथे जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे, या दुर्दैवी घटनेची चर्चा वाऱ्यासारखी भुसावळ तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून भुसावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे

आमदारांच्या संपर्क कार्यालयात एकच गर्दी
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना कार्यकर्त्यांनी घटना कळवल्यानंतर भुसावळ ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आमदारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती त्यांना कळवली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओचा समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून बस कोसळली त्यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याचं पाहायला मिळतं.

जिल्ह्यातील तिघा मंत्र्यांनी जाणली माहिती
पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे यांनीदेखील माहिती जाणून घेत युपी प्रशासनाशी संवाद साधला.

कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
अपघातग्रस्त बसमधील 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्यातील पाच गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे तसेच अन्य प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. नेपाळ दूतावासातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला जात असून पर्यटकांची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल, असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. नदीत बस पडल्याने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मंत्री रक्षा खडसे , भुसावळचे आमदार संजय सावकारे , भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे ,परीक्षित बऱ्हाटे आदी तातडीने काठमांडू येथे रवाना झाले आहे . इंदौर येथून सायंकाळी उत्तरप्रदेशात जातील आणि मग पुढे काठमांडू येथे हॉस्पिटलमध्ये पोहचतील ..

मंत्री गिरीश महाजन म्हणाले नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा निश्चित नाही !

– ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे घटनेची माहिती घेत असून दूतावास यांच्याशी त्यांनी संपर्क साधला यावेळी .भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल भागातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये शुक्रवारी अपघात घडला. या अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला आहे याचा आकडा अजून अधिकृत आलेला नसल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सरकार व प्रशासन दोन्हीही त्या ठिकाणच्या अधिकार्‍यांशी व नेपाळ येथील दूतावास यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे उपस्थित होते.

एअर लिप्ट करून उपचार
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, उत्तरप्रदेश गोरखपुर येथून निघालेली बस दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली. या बसमध्ये 43 प्रवासी होते. यामध्ये चार अद्याप बेपत्ता आहेत. 39 जणांना रेस्क्यू करण्यात आले असून 12 जणांना नेपाळ गोरमेंट एअरलिफ्ट करीत काठमांडू येथे रुग्णालयात हलवण्यात आले तर नऊ जणांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी 18 जण असे आहे त्यांच्याबद्दल अजूनही स्थानिक प्रशासनाने काही माहिती दिलेली नाही.

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, आमच्यापर्यंत अजून अधिकृत अशी माहिती आलेली नाही त्यामुळे आम्ही सुद्धा कन्फ्युज आहोत. अधिकारी व दूतावास यांच्यात बोलणे सुरू आहे. स्थानिक सरकारने मृतांचा आकडा अजून काही निश्चित सांगितलेला नाही. त्यामुळे आम्हालाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. हे सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील आहेत.